Guhagar : निगुंडळ केंद्राच्या केंद्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात

गुहागर : रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत निगुंडळ केंद्राच्या केंद्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धा जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा निगुंडळ 1 चे मुख्याध्यापक गोविंद साळवी यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. प्राथमिक शाळा तळवली नं.1 येथे पार पडल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन तळवली सरपंच मयुरी शिगवण व वडद सरपंच कोमल मुरमुरे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तळवली उपसरपंच संतोष जोशी, वडद उपसरपंच संदीप धनावडे, पत्रकार आशिष कारेकर, उत्तम पवार, मोठी बौद्धवाडी अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष राजाराम पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन पवार, उपाध्यक्ष सचिन केशव पवार, शिक्षण तज्ञ मनिषा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर स्पर्धेसाठी जि. प. पूर्ण प्रा. शाळा निगुंडळ -१ ख्याध्यापक गोविंद साळवी, शिक्षक संदीप वाघे, सत्यवान हातिसकर, शिक्षिका मधुरा पवार, जि. प. प्रा. शाळा निगुंडळ २ च्या शिक्षिका वर्षा परडे, जि. प. प्रा. शाळा निगुंडळ त्रिभुवनवाडी चे शिक्षक संजय कुळे, नवनाथ घाटुळ, जि. प. प्राथमिक शाळा तळवली १ चे मुख्याध्यापक एकनाथ जावरे, शिक्षिका दीपिका दबडे, जि. प. प्रा. शाळा तळवली २ च्या मुख्याध्यापिका सुजाता मोदी, जि. प. प्रा. शाळा तळवली ३ चे शिक्षक संतोष जानवळकर, शिक्षक सुधाकर कांबळे, जि. प.प्रा. शाळा तळवली 4 चे शिक्षक विजय कानसे, जि. प. पूर्ण प्रा. शाळा पेवे खरेकॉड चे शिक्षक विश्वास चव्हाण, जि. प.पूर्ण प्रा. शाळा वडद 1 चे शिक्षक शहाजी लेंडे, आशुतोष चितळे, बाळासाहेब जाधव, जि. प.प्रा. शाळा वडद 2 चे शिक्षक राहुल पवार, जि. प. प्रा. शाळा वडद 4 चे शिक्षक दत्तात्रय शिर्के, जि. प. पूर्ण प्रा. शाळा परचुरी 1 चे शिक्षक रणजीत सावंत, शैलेश शिवाजीराव यादव, जि. प. प्रा. शाळा परचुरी 2 चे शिक्षक सूर्यकांत शिगवण, जि.प. प्रा. शाळा परचुरी 3 चे शिक्षक सुमीत उफाड तसेच शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक समिती व ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 18/Dec/2025