चिपळूण : नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी प्रक्रिया २१ डिसेंबर रोजी गुरुदक्षिणा हॉल, युनायटेड हायस्कूल, मार्कडी (चिपळूण) येथे होणार असल्याने मतमोजणी दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी ८ ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यत सर्व वाहनांना बहादुरशेख नाका ते चिंचनाका रोड व चिंचनाका ते बहादुरशेख नाका हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येत आहे.
वाहतुकीसाठी बहादुरशेख नाका पावर हाऊस-चिंचनाका तसेच चिंचनाका-पावर हाऊस बहादुरशेख नाका या पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जारी केले आहेत.
नगरपालिका व नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर मतदान झाले असून, २१ डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया गुरुदक्षिणा हॉल, युनायटेड हायस्कुल, मार्कडी येथे होणार आहे. मतमोजणी वेळी वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चिपळूण नगरपालिका मतमोजणी वेळी २१ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सर्व वाहनांना बहादुरशेख नाका ते चिंचनाका रोड व चिंचनाका ते बहादुरशेख नाका हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. त्या ऐवजी बहादुरशेख नाका- पावर हाऊस-चिंचनाका तसेच चिंचनाका-पावर हाऊस – बहादुरशेख नाका या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३४ व मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५, ११६(१) (अ) (ब) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून जारी केले आहेत.
ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय व मंत्री महोदय यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पोलिसांनी परवानगी दिलेले वाहन यांना लागू होणार नाही. निकडीच्या व अत्यावश्यक प्रसंगी त्याठिकाणी तैनात असलेले संबंधित पोलीस अधिकारी हे निर्णय घेऊ शकतील, असेही या आदेशात म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 18/Dec/2025












