रत्नागिरी : शहरातील फाटक हायस्कूल व गांगण केळकर महाविद्यालयाच्या शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापक विजयानंद निवेंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय शिक्षक मारुती खरटमोल यांनी केला. प्रास्ताविक विज्ञान प्रमुख शिल्परेखा जोशी यांनी केले. संशोधनाचा वापर विद्यार्थ्यांनी देशहितासाठी करावा, असे आवाहन मुख्याध्यापक राजन कीर यांनी केले.
या विज्ञान प्रदर्शनात इ. ५ वी ते १२ वीतील विद्यार्थ्यांनी फायर सेफ्टी, वेस्ट मॅनेजमेंट, ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक, ग्रास कटर, मानवी पचन संस्था, गणितीय मॉडेल्स अशा विविध विषयांवर १३० प्रतिकृती मांडल्या होत्या. पाचवी-सहावीच्या गटात पारस लिंगायत आणि श्लोक सागवेकर यांच्या ग्रास कटर, आदित्य गोठणकर आणि तन्मय धावडे यांच्या रेन सेन्सर, तर देवश्री धुमक आणि कार्तिकी चव्हाण यांच्या जलचक्र यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.
सातवी आठवीच्या गटात सारा महाजन व मुक्ता बापट यांच्या हवा शुद्धीकरण, सोनाली सरदेसाई हिच्या सौरपंप, अर्णव पटवर्धन व अर्णव जोगळेकर यांच्या भूकंपशोधक तसेच नववी ते बारावीच्या गटात यश भिडे आणि मानस आग्रे यांच्या विघटनशील प्लास्टिक, बिल्वा रानडे आणि सोनम शेट्ये यांच्या टाकाऊतून ऊर्जा निर्मिती, तर अन्वय बोरकर आणि चिराग धुमाळ यांच्या वायरलेस पावर ट्रान्सफार्मर या प्रतिकृतींनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 18/Dec/2025












