दापोली : कोकणस्थ वैश्य समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजाला एकत्रित ठेवण्यासाठी केलेल्या अविरत कार्याची दखल घेत, दापोली तालुका कोकणस्थ वैश्य समाज, दापोली या संस्थेच्या वतीने यावर्षीचा प्रतिष्ठित ‘कै. अण्णा साहेब शिरगांवकर स्मृति पुरस्कार’ मंडणगड येथील डॉ. विकास मधुसूदन शेट्ये यांना जाहीर करण्यात आला आहे.
समाजकार्याची घेतली दखल
डॉ. विकास शेट्ये यांनी वैश्य समाजाला ‘इतर मागासवर्गात’ (OBC) पुनर्स्थापित करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच, जिल्हाध्यक्ष म्हणून वैश्य समाज एकत्रित रहावा, यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवेची आणि नेतृत्वाची दखल घेऊन दापोली तालुका कोकणस्थ वैश्य समाज संस्थेने त्यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा सदर पुरस्कार वितरण सोहळा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संपन्न होणार आहे.
दिनांक: रविवार, २१ डिसेंबर २०२५
वेळ: सकाळी ११.०० वाजता
स्थळ: हॉटेल वृंदावन सभागृह, दापोली.
यावेळी समाजातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्रीराम गणपत माजलेकर यांनी दिली आहे. डॉ. विकास शेट्ये यांना हा सन्मान जाहीर झाल्याबद्दल मंडणगड, दापोलीसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका अभ्यासू नेतृत्वाचा गौरव होत असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 19-12-2025














