रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे बेकायदा जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. करण्यात आली. प्रभाकर भिकाजी कांबळे (५३, रा. कांबळेवाडी, कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल भैरवनाथ सवाईराम यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, बुधवारी सकाळी संशयित हा कारवांचीवाडी येथील कॅफे न्यूटनच्या पाठीमागे एका पडक्या शेडमध्ये बेकायदा कल्याण मटका जुगार चालवत होता. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 19-12-2025














