चिपळूण : कामथे रुग्णालय येथे एका ३१ वर्षीय तरूणाचा आकस्मिक मृत्यू झाला. विश्वास विश्राम कदम (रा. खेडौं) असे त्याचे नाव आहे. ही घटना १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
या बाबत राजेंद्र कदम (रा. कान्हे) यांनी विश्राम पांडुरंग कदम यांना फोन करून तुमचा मुलगा विश्वास हा तीनवड बस स्टॉप पीकअप शेडजवळ मद्य पिऊन पडलेला आहे असे सांगितले. यानंतर विश्राम कदम तातडीने रिक्षाने पिंपळी येथे गेले व त्यांनी आपला मुलगा तेथे असल्याचे पाहिले. विश्राम कदम मुलाजवळ गेले व त्याला हलविले. यावेळी मुलगा विश्वास याने डोळे उघडले. परंतु त्याला बोलता येत नव्हते. यावेळी त्यांनी सोबत आणलेला ज्यूस त्याला पाजला. यानंतर रिक्षाने त्याला कामथे रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तो मृत असल्याचे सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:44 19-12-2025














