राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या २१ डिसेंबर रोजी असलेल्या मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आक. ती दोन फेच्यामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती राजापूर नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रकिया पार पडल्यानंतर आता २१ डिसेंबर रोजी मतमोजणी प्रकीया पार पडणार आहे. याकरीता प्रशासन सज्ज झाले असून दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. तशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विकास गंबरे यांनी दिली.
राजापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ५१ उमेदवार नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रकीया पार पडली. त्यानंतर आता २१ रोजी नगर परिषदेच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. रविवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. नगर परिषदेच्या एकूण दहा प्रभागाची मतमोजणी दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. यामध्ये १ ते ५ प्रभागाची मतमोजणी पहिल्या फेरीत तर ६ ते १० प्रभागाची मतमोजणी दुसऱ्या फेरीत होणार असल्याचे तहसीलदार गंबरे यांनी सांगितले.
मतमोजणी केंद्रावर उमेदवार आणि मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर मतमोजणी सहाय्यक, मतमोजणी परीक्षक व शिपाई असे कर्मचारी असणार आहेत. मतमोजणी दरम्यान बाजारपेठेतील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेतर जवाहर चौक ते जकातनाका, शिवाजीपथ या मार्गावरील एसटीसह अवजड वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे. तसा शहरात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे गंबरे यांनी सांगितले.
यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नायब तहसीलदार सरफरे, नगरपरिषद कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक शेख आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:04 19-12-2025














