रत्नागिरी: न्यायमूर्ती अजित कडेठाणकर उद्या वकिलांना मार्गदर्शन करणार

रत्नागिरी : उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू झाल्यानंतर नवीन वकिलांना मार्गदर्शन करण्याकरिता रत्नागिरी बार असोसिएशनने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यामध्ये वकिलांना सर्किट बेंचमधील वकिलीच्या संदर्भातील आव्हाने याविषयी न्यायमूर्ती अजित कडेठाणकर मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी (ता. २०) दुपारी २.०० वाजता न्यायमूर्ती कडेठाणकर रत्नागिरी जिल्हा न्यायालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. पैठणच्या जि. प. शाळेत शिकलेले आणि नामवंत वकील भगवानराव यांचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती कडेठाणकर यांना वाचनाचा छंद आहे. त्यातून त्यांनी बहुश्रुतता सांभाळली आहे. उच्च न्यायालयातील व कोल्हापूर खंडपीठातील वकिली व्यवसाय, व्यावसायिक शिस्त, न्यायालयीन कार्यपद्धती व अनुभवाधारित मार्गदर्शन न्यायमूर्ती कडेठाणकर करणार आहेत. जास्तीत जास्त वकिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:04 19-12-2025