रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी शहरातील अन्न व औषध विभागात रिक्त पदामुळे सध्या कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. एकूण ९ पदे रिक्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे.
कार्यालयास कोणी वाली आहे का नाही, अन्न व औषध विभाग रामभरोसे सुरू असल्याची चर्चा सध्या रत्नागिरी शहरात सुरू आहे. सध्याचे प्रभारी सहायक आयुक्त नितीन मोहिते हे रत्नागिरी दोन महिन्यातून एकदाच येतात. त्यामुळे पूर्णवेळ अन्न सहायक आयुक्त, ९ पदे भरावीत अशी मागणी होत आहे.
रत्नागिरी शहर, जिल्ह्यातील ग्राहकांना चांगले अन्न व औषध मिळावे तसेच निकृष्ट अन्न विक्री करण्यावर चाप रहावी यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग काम करते. तत्कालीन सहायक अधिकारी दीनानाथ शिंदे यांनी कार्यालयात सुसूत्रता आणली होती. त्यांच्या काळात कारवाई झाल्या, १७ हजारहून अधिक दुकानांना परवाने देण्यात आली. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर प्रभारी पद रायगडे अधिकारी नितीने मोहिते यांच्याकडे सोपविला. मात्र ते रत्नागिरी विभागात दोन महिन्यातून एकदा येत असल्याचे सांगण्यात आले.
या विभागात कित्येक वर्षापासून रिक्त पदे असल्यामुळे इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. सहायक आयुक्त अन्न व विविध ९ पदे रिक्त आहेत. जिल्ह्याला शहर, ग्रामीण भागासाठी स्वतंत्र सहायक आयुक्तपद भरावे अशी मागणी वाढत आहे मात्र अद्याप परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. तीन कर्मचारी संगणाकावर काम करताना दिसून आले. उर्वरित दोन्ही मुख्य कार्यालयात रिकाम्या खुर्चा, औषध विभागात ही तशीच परिस्थिती दिसून आली. जिल्ह्यातील नागरिकांना चांगले अन्न, औषध मिळणे गरजेचे आहे. औषध, मिठाई, विविध हॉटेल्सची तपासणी होणे गरजेची आहे.
ही पदे आहेत रिक्त
अन्न व औषध विभागात सध्या १८ कर्मचारी काम करीत आहेत. नुकतेच चार नवीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. तरीही एकुण ९ पदे रिक्त आहेत. सहायक आयुक्त अन्न १, औषध निरीक्षक, अन्न सुरक्षा अधिकारी ३, वरिष्ठ लिपिक १, लिपिक टंकलेखक २, वाहन चालक १, नमुना सहायक १ आदी नऊ पदे रिक्त आहेत. अद्याप भरलेली नसून कार्यालयात कर्मचारी ऐवजी मोकळया खुर्चा दिसत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 19-12-2025













