ना. उदय सामंत यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य; डी.जे. सामंत महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार जिल्हास्तरीय कबड्डीचा थरार!

पाली : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री ना. श्री. उदयजी सामंत यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त पालीमध्ये क्रीडा रसिकांसाठी एका भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाली युवा मंच, शिवसेना शाखा पाली पाथरट व युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, यात जिल्ह्यातील नामवंत संघ सहभागी होणार आहेत.

रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत खेळवल्या जातील.

स्पर्धेचा कालावधी आणि ठिकाण:

  • दिनांक: २३, २४ आणि २५ डिसेंबर २०२५
  • स्थळ: डी. जे. सामंत महाविद्यालय मैदान, पाली.

बक्षिसांची लयलूट: या स्पर्धेतील विजेत्या संघांवर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.

  • पुरुष गट (प्रथम क्रमांक): रु. २१,१११/- रोख व आकर्षक चषक
  • पुरुष गट (द्वितीय क्रमांक): रु. १५,५५५/- रोख व आकर्षक चषक
  • महिला गट: विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे पाली परिसरात क्रीडा वातावरण निर्मिती झाली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नाव नोंदणी व संपर्कासाठी: स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

  • अतुल सावंत: ९४०४१६०३३४
  • स्वप्नील घडशी: ७३८७७३९५६४
  • ऋषिकेश साळुंखे: ८०८०३८६०९२