रत्नागिरी : ‘आनंदाचा शिधा’ वितरण सुरू

रत्नागिरी : गणपती उत्सवापासून सुरू असलेली आनंदाचा शिधाची प्रतीक्षा संपली असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रेशनवितरण प्रणालीत आनंदाचा शिधाचे वितरण सुरू झाले. त्यामुळे सर्वसमान्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा वितरण अडचणीत आले होते. अखेर आनंदाचा शिधा वितरित करताना त्याच्या पिशव्यावरील राजकीय मजकूर आणि छायाचित्रे हटविल्यानंतर शिधा वितरणातील अडचणी दूर झाल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:10 26-10-2024