रत्नागिरी: पर्यटनावर आजपासून पथनाट्य

रत्नागिरी : आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सव २०२६ निमित्ताने सागरकिनारी आणि नैसर्गिक पर्यटनस्थळी जबाबदार पर्यटनावर आधारित पथनाट्य सादर होणार आहेत.

रत्नागिरीतील सार्वजनिक ठिकाणी सादरीकरण होणार असून, त्याची सुरुवात शनिवारी (ता. २०) रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे होणार आहे. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थी पथनाट्य सादर करणार असून, पर्यटन, पर्यावरणाची जाणीवजागृती या निमित्ताने हे पथनाट्य संदेश देणार आहे.

येत्या १५ ते १८ जानेवारी या कालावधीत सागर महोत्सव- सीव्हर्सचे आयोजन आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनद्वारे करण्यात आले आहे. सागरी जैवविविधता, खाडी, कांदळवन संवर्धनासाठी व्याख्याने, संशोधन, अभ्याससहल, पथनाट्य माध्यमातून समुद्राबद्दल जनजागृती व सहभाग वाढवणे या हेतूने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. पथनाट्याच्या माध्यमातून मासेमारी, जबाबदार पर्यटन, सागरी जीवनसुरक्षा या विषयाचे प्रबोधन व जाणीवजागृती करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 20-12-2025