Ratnagiri: कोकण बोर्ड कर्मचाऱ्यांची निदर्शने

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात असणाऱ्या रिक्त जागा व अन्य मागण्यांसाठी रत्नागिरीत कोकण शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून निदर्शन केली.

पुणे शिक्षण मंडळांतर्गत राज्यात नऊ विभागीय मंडळे कार्यरत असून कनिष्ठ लिपिकांच्या

५९१ जागांपैकी ३६० हून अधिक जागा रिक्त आहेत. वर्षभरापूर्वी जागा भरण्यासाठी कर्मचारी महासंघाने निवेदनेही दिली होती. कर्मचारी भरतीचा प्रस्ताव मंजूर होऊनही भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर दोन ते चार पदांचा भार पडला असून, कर्मचाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे कर्मचारी महासंघाने आंदोलन पुकारले आहे. १७ ते २३ डिसेंबरपर्यंत काळी फित लावून आंदोलनास सुरुवात झाली आहे. कोकण विभागातील कर्मचाऱ्यांनी काळीफित लावून जेवणाच्या सुट्टीमध्ये निदर्शन केली. विभागीय शिक्षण मंडळांच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनामुळे १० वी व १२वीच्या परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांची ही आंदोलने टप्प्याटप्याने होणार आहे. २४ ते ३० डिसेंबरदरम्यान सुट्टीमध्ये निदर्शन आणि जादा कामाला अनुपस्थित राहणे, ३१ डिसेंबर रोजी सामुदायिक रजा आंदोलन, १ जानेवारी नववर्षदिनी काळी फित लावून आंदोलन व घोषणा दिल्या जाणार आहेत. तर २ जानेवारीपासून कर्मचारी बेमुदत आंदोलन पुकारणार असल्याचे महासंघाच्यावतीने सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 20-12-2025