साठरेबांबर येथून बैलांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील साठरेबांबर तळी येथून चार गावठी बैलांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या कोल्हापूर येथील दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई १८ डिसेंबर रोजी दुपारी २.१५ वा. सुमारास करण्यात आली. संशयितांकडून एक आयशर टेम्पो आणि चार बैल असा एकूण ८ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ऋषीकेश दिलीप खोंगे (रा. ससेगाव, ता. शाहूवाडी, कोल्हापूर) आणि अविनाश सुरेश गोसावी (२३, रा. शाहूवाडी, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात महिला पोलिस शिपाई दर्शना शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन्ही संशयित संगनमताने गुरे वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसताना गुरुवारी दुपारी आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो (एमएच-०९-जीजे-५५८५) मधून चार बैलांची वाहतूक करत होते. या बैलांची पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी न करता तसेच त्यांना पाणी अगर खाद्य न देता टेम्पोमध्ये वेदना किंवा यातना होतील अशा पध्दतीने दोरीने वाहतूक करण्यात येत होती. संशयितांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 20-12-2025