खेड : मुंबई-गोवा महामार्गालगत वेरळ दर्गे परिसरात १८ रोजी सायं. ६ च्या सुमारास मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील दोघे जखमी झाले आहेत. खेड येथून खोपीच्या दिशेने जात असलेली मोटरसायकल (एमएच ०८ बीजी ६६७२) अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने रस्त्यावर घसरून अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रीजखाली असलेल्या श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य जी संस्थेच्या रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये बापू रामचंद्र पवार (५०, रा. पोसरे) व बबन हनुमान निकम (३५, रा. खोपी) यांचा समावेश आहे. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 20-12-2025














