Chiplun: मिरजोळी, पिंपळी येथे दारू जप्त

चिपळूण : तालुक्यातील पिंपळी बु. कॅनॉलच्या बाजूला तसेच मिरजोळी एमआयडीसी रोडलगत गावठी हातभट्टीची दारू विकताना पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये दिनेश दिलीप मोडक (वय ४२, रा. कान्हे) तसेच वैभव वसंत भुवड (३९, रा. शिरळ भुवडवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मिरजोळी एमआयडीसी रोड येथे १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल वैभव जाधव यांनी ही फिर्याद दिली आहे.

यामध्ये आरोपी वैभव भुवड याने बेकायदेशिरपणे गोवा बनावटीची दारू बाळगली व त्याच्याकडे ८५२ रूपये किंमतीची दारू व प्लॅस्टीकच्या २५ बाटल्या सापडल्या तर पिंपळी बु. कॅनॉलच्या बाजूला एका झाडाखाली १८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दिनेश दिलीप मोडक हा गावठी हातभट्टीची दारू विनापरवाना जवळ ठेवल्याचे आढळून आला. त्याच्याकडून २१०० रूपये किमतीची २० लीटर गावठी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 20-12-2025