Sangmeshwar: उपळेत औषध सेवनामुळे प्रौढाचा मृत्यू

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील उपळे वरचीवाडी येथील एका ५२ वर्षीय प्रौढाचा औषध सेवनातून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रकाश गुणाजी जाधव (वय ५२) असे मयताचे नाव असून, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

याप्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश जाधव यांनी १२ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरात कोणतेतरी औषध घेतले होते.

या औषधामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र, जाकादेवी येथे उपचारासाठी नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच १४ डिसेंबर रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद १७डिसेंबरला करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 20-12-2025