लांजा : मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ येथे विनंती बस थांबा (प्रवासी निवारा) शेडचे बांधकाम न केल्याने वेरळ गावच्या ग्रामस्थांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत संताप व्यक्त केला. मागण्याही पूर्ण न झाल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. वेरळ येथील बस थांब्याजवळ महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने कमी जागा अधिग्रहण करण्यात आली. त्यामुळेया ठिकाणी प्रवासी निवारा शेड बांधण्यात आली नाही. शिवाय वेरळ बस थांब्याजवळ महामार्गाची बंदिस्ते गटारे, सर्विस रोड यासाठी संबंधित बांधकाम विभागाने जागेची तरतूद केलेली नसल्याने प्रवाशांना महामार्गवर उभे राहून गाड्यांची वाट पाहावी लागत आहे. अखेर वेरळ ग्रामस्थांच्या वतीने बांधकाम विभागाचे (महामार्ग) उपअभियंता कुलकर्णी यांना बोलवून जाब विचारण्यात आला. चौपदरीकरण झाल्याने आता प्रवाशांना त्रास होत आहे त्यावर उपाययोजना बाबत विचारणा करण्यात आली. बस थांब्यासाठी आपण भूमी अभिलेख कार्यालयाकडे जागा मोजून घेण्यासाठी असल्याचे कुलकर्णी यांनी नागरिकांना सांगितले.
पत्रव्यवहार करणार
गावच्या मागण्या मान्य न झाल्यास महामार्ग रोखू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी सरपंच सुवर्णा जाधव, दिपाली साळवी, शरद चरकरी, प्रभाकर चव्हाण, सुधाकर लांजेकर, स्मिता खामकर, मंगेश डाकवे, दिनेश पातेरे, महेश गुंड्ये आदींसह सुमारे दोनशे ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 20-12-2025














