अलिबाग : नदी किनारी असलेल्या खारफुटीचे जंगल आणि सक्षम होत असलेल्या अन्नसाखळीमुळे रायगड जिल्ह्यातील नद्यामध्ये मगरीचा मुक्त संचार वाढू लागला आहे. सावित्री नदीत मगरीचा नैसर्गिक अधिवास आहे.
या अधिवासाचे क्षेत्र वाढत असून, आता राजापुरी खाडीतही मगरीचे अधिवास आढळून येत आहे वनविभागाच्या कांदळवन विभागाने नैवविविधता वाढीसाठी काही योजनाबद्ध उपाययोजना राबवले आहेत. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन संस्थांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत असून, रायगडमधील किनारीपट्टीत जैवविविधतेत भर पडत असल्याचे दिसून येत आहे.
खाडीकिनारी सापडणाऱ्या उदमांजर, मगरी यांची शिकार होऊ नये, म्हणून उपाययोजना केल्या आहे. वनविभागाने त्यासाठी वेगळा कांदळवन कक्ष स्थापन केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 26/Oct/2024














