संगमेश्वर आठवडा बाजारात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ

देवरुख : संगमेश्वर आठवडा बाजारात भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला आहे. बुधवारी बाजारात चोरट्यानी चक्क तीन मोबाईल लांबवले.

बाजारात येणाऱ्या ग्राहकांची पाकिटे मारणे या बरोबर अनेक लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार असल्याने खरेदीसाठी विशेषतः महिला वर्गाची संगमेश्वर आठवडा बाजारात चांगलीच गर्दी होती. या गर्दीचा फायदा उचलत चोरट्याने चांगलाच फायदा उचल्याचे बोलले जात आहे. चोरट्याने गर्दीचा फायदा उचलत चक्क तर तब्ब्ल तीन मोबाईल फोन हातोहात लांबवले आहेत.

यापैकी संत्या भोंगाळे रा, वांद्री, प्रकाश वारोसे रा, तेर्ये यांचे बाजारात भाजी खरेदी करताना मोबाईल पळवले तर पांडुरंग तावडे रा, कळंबस्ते मळदेवाडी यांचा संगमेश्वर एसटी स्थानक आवारातुन मोबाईल लंपास करण्यात आला.

संगमेश्वर आठवडा बाजारात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने ग्राहक वर्गात चांगलीच दहशत पसरल्याचे पाहायला मिळत होती. या साऱ्या प्रकाराची दखल घेत संगमेश्वर पोलिसांनी आठवडा बाजारात बंदोबस्त ठेवावा तसेच या चोरट्याच्या लवकरात लवकर मुसक्या आवळाव्यात अशी मागणी पुढे येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:40 20-12-2025