तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक २३ रोजी देवरुखात

देवरुख : शेती म्हणजे केवळ उत्पादन नव्हे, तर मातीशी नाते, शेतकऱ्यांचा सन्मान आणि शाश्वत भवितव्याची उभारणी या विचारांना प्रत्यक्षात उतरवणारे तामिळनाडूचे शेतकऱ्यांचे मार्गदर्शक, पोनुस नॅचरल प्रॉडक्ट्सचे संस्थापक व शेतीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व श्री. पोन्नुसामी हे देवनगरी देवरुख येथे संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना २३ डिसेंबर रोजी भेटणार आहेत.

यानिमित्त देवरुख पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात त्यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन संगमेश्वर तालुका अॅग्रोस्टार फार्मफ्रेश शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.

हजारो तामिळनाडूमध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारे श्री. पोन्नुसामी हे कमी asfy खर्चात जास्त उत्पादन, मातीचे आरोग्य, सेंद्रिय व शाश्वत शेती या विषयांवर प्रत्यक्ष अनुभवातून मार्गदर्शन करणार आहेत. श्री. पोन्नुसामी यांचे मूळ भाषण तामिळ भाषेत होणार असून त्याचे मराठीमध्ये रूपांतर मूळचे तामिळनाडूचे आणि गेली २५ वर्षे देवरुखचे रहिवासी असलेले प्रथितयश व्यापारी चेन्नपंडियन देवर शेठ करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 20-12-2025