Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार कोईमतूर-हरिद्वार स्पेशल

खेड : कोकण रेल्वे मार्गावर दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने कोईमतूर-हरिद्वार स्पेशल चालवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने गुरुवारी जाहीर केले. त्यानुसार कोईमतूर-हरिद्वार स्पेशल २४ डिसेंबर रोजी धावेल.

कोईमतूर येथून सकाळी ११.१५ सुटणारी स्पेशल २७ डिसेंबर रोजी १२.५ वाजता हरिद्वार येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ३० डिसेंबरला हरिद्वार येथून रात्री १०.३० वाजता सुटून २ जानेवारीला पहाटे ४ वाजता कोईमतूर येथे पोहोचेल.

१८ एलएचबी डब्यांच्या या स्पेशलला पालघाट, शोरानूर जंक्शन कोझिकोड, कन्नूर, मंगळूर जंक्शन उडुपी, कुंदापुरा, मुकांबिका रोड बायंदूर, कारवार, मडगाव जंक्शन थिविम, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, वसई रोड, उधना जंक्शन वडोदरा जंक्शन, रतलाम जंक्शन कोटा जंक्शन, सवाई माधवपूर मथुरा जंक्शन, गाझियाबाद व रुरक स्थानकांवर थांबे आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:40 20-12-2025