रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून, जिल्ह्यात महायुतीची (शिवसेना-भाजप) त्सुनामी पाहायला मिळाली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांची रणनीती यशस्वी ठरली असून, रत्नागिरी, खेड, चिपळूण आणि लांजा अशा ४ महत्त्वाच्या ठिकाणी शिवसेनेचे (शिंदे गट) नगराध्यक्ष प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत. तर गुहागर आणि देवरुख नगरपंचायतीवर भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. राजापूर नगरपरिषदेत मात्र काँग्रेसने आपला गड राखत नगराध्यक्षपद जिंकले आहे.
पालकमंत्र्यांचे शब्द खरे ठरले: रत्नागिरीत शिल्पाताई सुर्वे विजयी! रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. ना. उदय सामंत यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवत सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी नगराध्यक्षपदी विजय मिळवला आहे. तसेच ३२ पैकी तब्बल २३ जागा जिंकत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली आहे.
📍 असा आहे निकालाचा लेखाजोखा (तालुका निहाय):
१. रत्नागिरी नगरपरिषद: (शिवसेना सुसाट)
- नगराध्यक्ष (विजयी): शिल्पा सुर्वे (शिवसेना)
- नगरसेवक पक्षीय बलाबल (एकूण ३२ जागा):
- शिवसेना: २३ (स्पष्ट बहुमत)
- भाजप: ०६
- उद्धव ठाकरे सेना: ०३
२. खेड नगरपरिषद: (रामदास कदम गड शाबूत)
- नगराध्यक्ष (विजयी): माधवी बुटाला (शिवसेना)
- नगरसेवक पक्षीय बलाबल (एकूण २१ जागा):
- शिवसेना: १८ (एकहाती सत्ता)
- भाजप: ०३
३. चिपळूण नगरपरिषद: (उमेश सकपाळ विजयी)
- नगराध्यक्ष (विजयी): उमेश सकपाळ (शिवसेना)
- नगरसेवक पक्षीय बलाबल (एकूण २८ जागा):
- शिवसेना: ०९
- भाजप: ०८
- उद्धव ठाकरे सेना: ०५
- काँग्रेस: ०३
- राष्ट्रवादी (अजित पवार): ०२
- राष्ट्रवादी (शरद पवार): ०१
४. राजापूर नगरपरिषद: (काँग्रेसचा एकमेव गड)
- नगराध्यक्ष (विजयी): हुस्नबानू खलिपे (काँग्रेस)
- नगरसेवक पक्षीय बलाबल (एकूण २० जागा):
- शिवसेना: ०९ (जास्त नगरसेवक असूनही नगराध्यक्ष काँग्रेसचा)
- काँग्रेस: ०७
- उद्धव ठाकरे सेना: ०३
- भाजप: ०१
५. लांजा नगरपंचायत: (शिवसेनेचा दणदणीत विजय)
- नगराध्यक्ष (विजयी): सावली कुरुप (शिवसेना)
- नगरसेवक पक्षीय बलाबल (एकूण १७ जागा):
- शिवसेना: १० (बहुमत)
- भाजप: ०१
- अपक्ष: ०५
- उद्धव ठाकरे सेना: ०१
६. गुहागर नगरपंचायत: (भाजपचे कमळ फुलले)
- नगराध्यक्ष (विजयी): निता मालप (भाजप)
- नगरसेवक पक्षीय बलाबल (एकूण १७ जागा):
- शिवसेना: ०८
- भाजप: ०५
- उद्धव ठाकरे सेना: ०२
- राष्ट्रवादी (अजित पवार): ०१
- मनसे: ०१
७. देवरुख नगरपंचायत: (काटे की टक्कर, पण नगराध्यक्ष भाजपचा)
- नगराध्यक्ष (विजयी): मृणाल शेट्ये (भाजप)
- नगरसेवक पक्षीय बलाबल (एकूण १७ जागा):
- राष्ट्रवादी (अजित पवार): ०४
- अपक्ष: ०४
- भाजप: ०३
- शिवसेना: ०३
- उद्धव ठाकरे सेना: ०३
विश्लेषण : या निकालांवरून स्पष्ट होते की, रत्नागिरी जिल्ह्यात महायुती (शिवसेना+भाजप) सर्वात मोठी शक्ती म्हणून समोर आली आहे. विशेषतः उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, त्यांना एकाही ठिकाणी नगराध्यक्षपद मिळवता आले नाही. पालकमंत्र्यांच्या होमग्राऊंडवर (रत्नागिरी) आणि रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात (खेड) शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.














