रत्नागिरी नगरपालिका निकालासाठी ‘रत्नागिरी खबरदार’च ‘नंबर १’! तब्बल ६९,५५० दर्शकांनी अनुभवला थरार; थेट प्रक्षेपणाला रेकॉर्डब्रेक पसंती

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, रत्नागिरीकरांनी विश्वासार्ह आणि वेगवान अपडेट्ससाठी पुन्हा एकदा ‘रत्नागिरी खबरदार’ (Ratnagiri Khabardar) ला पहिली पसंती दिली आहे. आज सकाळी पार पडलेल्या मतमोजणीचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) तब्बल ६९ हजार ५५० दर्शकांनी पाहून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

गतिमान अपडेट्सचा ‘हाऊसफुल्ल’ शो!

आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असली, तरी ‘रत्नागिरी खबरदार’ने सकाळी ९ वाजल्यापासूनच थेट प्रक्षेपणाला सुरुवात केली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत चाललेल्या या लाईव्ह कव्हरेजमध्ये प्रत्येक फेरीचा निकाल सर्वात आधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आला. त्यामुळेच युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांची अक्षरशः झुंबड उडाली होती.

उमेदवारही लाईव्ह पाहूनच केंद्रावर!

या लाईव्ह कव्हरेजची विश्वासार्हता एवढी होती की, मतमोजणी केंद्राच्या बाहेर ताटकळत उभ्या असलेल्या हजारो कार्यकर्त्यांचे डोळे ‘रत्नागिरी खबरदार’च्या लाईव्हवर खिळले होते. विशेष म्हणजे, अनेक उमेदवारांनी आपली आघाडी किंवा विजयाची खात्री या थेट प्रक्षेपणातून केली आणि त्यानंतरच जल्लोष करण्यासाठी किंवा निकाल स्वीकारण्यासाठी मतमोजणी केंद्र गाठले.

विश्लेषण आणि प्रतिक्रियांची मेजवानी

केवळ आकडेवारीच नव्हे, तर या थेट प्रक्षेपणात ज्येष्ठ पत्रकारांचे सखोल राजकीय विश्लेषण आणि विजयी उमेदवारांच्या ताज्या प्रतिक्रिया प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळाल्या. तंत्रज्ञानाचा वापर आणि अचूक बातमीदारी यामुळे ‘रत्नागिरी खबरदार’च्या या उपक्रमाला रत्नागिरीकरांनी भरभरून दाद दिली आहे.