रत्नागिरी खबरदारचा ‘कौल’ ठरला अंतिम सत्य! सर्वेक्षणात ‘टॉप’ ठरलेल्या शिल्पाताई सुर्वेच झाल्या नगराध्यक्ष; भाकीत १००% खरे

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, या निकालाने पुन्हा एकदा एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे, ते म्हणजे ‘रत्नागिरी खबरदार’ची विश्वासार्हता! निवडणुकीपूर्वी आम्ही घेतलेला जनतेचा कौल (Public Opinion) पुन्हा एकदा तंतोतंत खरा ठरला आहे. आमच्या सर्वेक्षणात जनतेने ज्यांना पहिली पसंती दिली होती, त्या सौ. शिल्पाताई सुर्वे यांनीच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.

काय होते सर्वेक्षण?

रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ‘रत्नागिरी खबरदार’ने एक व्यापक ऑनलाइन आणि ऑफलाईन सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. “रत्नागिरीचा नगराध्यक्ष म्हणून आपण कुणाला पसंती द्याल?” असा थेट प्रश्न जनतेला विचारण्यात आला होता.

जनतेने दिली होती पहिली पसंती

या सर्वेक्षणात रत्नागिरीकर जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यामध्ये शिल्पा सुर्वे यांना सर्वाधिक म्हणजेच २८.२ टक्के मते मिळाली होती. ‘रत्नागिरी खबरदार’च्या या सर्व्हेचा आधार घेत आणि जनतेचा कल लक्षात घेऊनच त्यानंतर शिवसेनेने शिल्पा सुर्वे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली होती. आज लागलेल्या निकालात शिल्पा सुर्वे यांना मिळालेले प्रचंड मताधिक्य हे सिद्ध करते की, आमचा सर्व्हे जमिनीवरील वास्तवाशी तंतोतंत जुळणारा होता.

इतिहास पुन्हा घडला: राहुल पंडितांचे भाकीतही ठरले होते खरे

केवळ यंदाच नाही, तर ‘रत्नागिरी खबरदार’चा हा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ कायम राहिला आहे. रत्नागिरी नगरपालिकेच्या मागील निवडणुकीतही आम्ही अशाच प्रकारचे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी जनतेने राहुल पंडित यांच्या नावाला पहिली पसंती दिली होती. आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राहुल पंडित हेच नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. आजच्या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, रत्नागिरीच्या जनतेच्या मनात काय चाललंय, याची सर्वात अचूक नाडी फक्त ‘रत्नागिरी खबरदार’लाच समजते!