दापोली : दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात सध्या टायनी कोळंबीची आवक वाढताना दिसत आहे. लिलावात समाधानकारक दर मिळत असल्याने मच्छीमारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक तसेच बाहेरील व्यापाऱ्यांकडून वाढलेली मागणी लक्षात घेता हर्णे बंदरातील मत्स्य व्यवसायाला चांगली चालना मिळत आहे.
टायनी कोळंबी ही लहान आकाराची, चवीला गोड व मऊ असल्याने करी, फ्राय, सूप आदी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेसह बाहेरील जिल्ह्यांतूनही या कोळंबीला चांगली मागणी आहे. दापोलीत आलेल्या पर्यटकांसी टायनी कोळंबी खास आकर्षण ठरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 22/Dec/2025














