Chiplun : नांदिवसेत मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

चिपळूण : अनुभव प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे नांदिवसे येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी लोटे येथील परशुराम हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने रुग्ण तपासणी केली. सरपंच सायली शिंदे यांनी शिबिराचे उद्घाटन केले. परशुराम हॉस्पिटलच्या पी.आर.ओ. सुष्मिता पाटील यांनी मार्गदर्शन केले. अनुभव प्रतिष्टान ट्रस्टचे कार्यकर्ते गणेश खेतले यांनी प्रस्तावना केली. शिबिरामध्ये परशुराम हॉस्पिटलचे मेडिसिन स्पेशालिस्ट डॉ. अनमोल बेलवलकर, शल्य चिकित्सा तज्ज्ञ डॉ. योगेश बोरसे, स्त्रीरोग व पंचकर्म तज्ञ डॉ. सपना पाटील, नेत्ररोग तज्ञ डॉ. श्रद्धा राठोड यांनी नेत्र चिकित्सा, अस्थीरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, महिलांचे आजार व उपचार याबाबत रुग्णांची तपासणी केली.

यावेळी नरसिंगराव शिंदे, ग्राम अधिकारी पांडुरंग गावडे, तलाठी रफिक शेख, प्रदीप शिंदे, अमृता कदम, प्रमिला कदम, विनायक वरुडे, स्वाती शिगवण, संपदा शिंदे उपस्थित होते. शिबिर यशस्वितेसाठी अनुभव प्रतिष्ठान ट्रस्टचे विजय कदम, संजना चिले यांनी महत्वाची भूमिका निभावली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 22/Dec/2025