चिपळुणात पेन्शनधारकांसाठी आरोग्यविषयक चर्चासत्र

चिपळूण : पेन्शनर दिनाचे औचित्य साधून माधवबाग चिपळूण यांच्यावतीने पेन्शनधारकांसाठी मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग यावर चर्चासत्र शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाले. यावेळी माधवबागचे डॉ. यतीन जाधव यांनी ज्येष्ठांनी आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी व माधवबागच्या रुग्णोपयोगी योजना यासंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. राधा मोरे यांनी हृदयविकार आणि मधुमेहावर व माधवबागतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबाबत माहिती दिली. पेन्शनर संघटना चिपळूण अध्यक्ष शशिकांत कदम यांनी स्वागत केले. याप्रसंगी केशवराव कुंभार, प्रमोद चौगुले, आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 22/Dec/2025