देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर म्हस्के वाडीत दिवसा ढवळ्या बिबट्या घरात घुसल्याने ग्रामस्थांची भीतीने गाळण उडाली. ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बिबट्याला अखेर पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. हस्केवाडीत सदाभाऊ म्हस्के यांच्या घर पारड्यात बिबट्या वावरत होता. एक कोंबड्यावर झडप घालून नेत असताना त्यांच्या पत्नी जयश्री म्हस्के यांनी पाहून आरडाओरड केली. यामुळे बिबट्या काही वेळ दबा धरून लपून बसला.
काही वेळानंतर तो बाहेर पडला व पुन्हा बिनधास्त वावरू लागला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ जमले आरडा ओरड केल्यानंतर तो लगेच महादेव सुर्वे यांच्या घरात शिरला. बिबट्या आल्याची माहिती वामन म्हस्के, विमलाकांत पवार यांनी गाववाल्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सरपंच विनोद पवार यांनी वनखात्याला तत्काळ माहिती दिली. वनखात्याने पण तत्परता दाखवत पिंजरा लावून वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राजा म्हस्के व ग्रामस्थांनी या कामी मेहनत घेतली. बिबट्या पकडण्याचे काम सुरू झाले. याला काही तासांत बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. यामुळे ग्रामस्थांनी निःश्वास सोडला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 22/Dec/2025














