साखरपा-गोवरे वाडी रस्त्याचे काम पूर्ण

साखरपा ः साखरपा-गोवरे वाडीतील रस्ता पूर्ण झाला असून, या रस्ताला गोवरेवाडीतील दानशूर व्यक्तींनी जागा विनामूल्य दिली होती. महामार्गासाठी येथे १०० मीटरचा रस्ता मंजूर होता; परंतु लोकांची गैरसोय लक्षात घेऊन हा रस्ता ४०० मीटर रुंद करण्यात आला. यासाठी आमदार किरण सामंत यांनी पाठपुरावा केला होता. गोवरेवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी या कामासाठी मोलाचे सहकार्य केले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच ग्रामपंचायत सदस्य ओंकार कोलते यांनी हा प्रश्न आमदार सामंत यांच्यापुढे मांडला होता.

तसेच माजी शिक्षण सभापती विलास चाळके, माजी सभापती जया माने, शिवसेना नेते संजय सुर्वे, सरपंच शशिकांत गुरव, दीपक गोवरे, माजी सरपंच विनायक गोवरे यांनीही वेळोवेळी मदत केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 22-12-2025