रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील महाविद्यालयांनी शैक्षणिक सहलीसाठी लालपरीलाच पसंती दिली असून नोव्हेंबर महिन्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यात ही एसटी बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे. सुमारे ४०० हून अधिक बसेसचे बुकिंग झाले आहे. डिसेंबरच्या पहिल्या १५ दिवसांत कोटींचे उत्पन्न मिळाले होते. जानेवारी महिन्यात ही रत्नागिरी एसटी विभागाला प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगण्यात आले.
नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने शाळा, महाविद्यालयांच्या सहली निघतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंदाच्या वर्षी शैक्षणिक सहल एसटी बसेसमधूनच करा असे आदेश काढले आहेत. या आदेशाला जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात तब्बल २०१ एसटी बसेस धावल्या असून उत्पन्नात रत्नागिरी विभाग राज्यात तिसरा आला आहे.
दि. १ ते १६ डिसेंबर या १६ दिवसात तब्बल कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. शैक्षणिक सहलीसाठी जिल्ह्यातील गणपतीपुळे, आरे वारे बी, थिबा पॅलेस, रत्नदुर्ग किल्ला, जयगड किल्ला, मंदिरे, वस्तूसंग्रहालय, मालवण, तारकर्ली, देवगड बीच, किल्ले, यासह मराठवाडा, मुंबई, पुणे येथे शैक्षणिक सहल जात आहे.
शैक्षणिक सहलीसाठी खासगी ऐवजी एसटी बसेसचा वापर करा असे आदेश काढल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांनी मोठ्या प्रमाणात एसटी बसेस बुकींग केल्या आहेत. नोव्हेंबर नंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यांसाठी ही बुकींग झालेल्या आहेत-प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 22/Dec/2025














