रत्नागिरी : तालुक्यातील चरवेली येथील घराच्या अंगणातून दुचाकी चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी (१९ डिसेंबर) दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी नामदेव सिद्राम भोसले (वय ३३, रा. नवीन वसाहत दुर्गामातानगर चरवेली, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी त्यांनी दुचाकी (एमएच ०८, एएस ७७६३) ही घराच्या अंगणात उभी केली होती. शुक्रवारी दुपारी ते अंगणात गेले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 22/Dec/2025














