खेड : कोणत्यातरी रेल्वेने प्रवास करताना तोल जाऊन रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या पुरुषाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्ष असून, गुरुवारी (१८ डिसेंबर) सायंकाळी भोस्ते रेल्वे पुलाच्या रुळाजवळ उताराच्या भागात तो पडलेला होता. या मृतदेहाची ओळख पटलेली नसून, याप्रकरणी खेड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 22/Dec/2025














