Guhagar : हेदवी मुख्य रस्ता ते बौधवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

गुहागर : हेदवी मुख्य रस्ता ते बौधवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ गुहागर भाजपचे तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मंगेश रांगले, माजी सभापती सुरेश सावंत, हरिश्चंद्र तांबे, विनायक जाधव, ग्रामपंचायत सदस्या मुग्धा वाटकर, सुरेंद्र भाटकर, स्वरूपा हळदणकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. या रस्त्याचा कामामुळे येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. येथील ग्रामस्थानी अभय भाटकर यांचे या कामाबाबत आभार मानले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 22/Dec/2025