Jagannath Gangaram Pednekar Vidhyalaya | तळवडे येथील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर विद्यालय हरित उपक्रमात राज्यस्तरावर

लांजा : तालुक्यातील तळवडे येथील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयाची भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वच्छ एवम हरित विद्यालय रेटिंग उपक्रमामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून राज्यस्तरावर निवड झाली आहे.

याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याहस्ते पेडणेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर यांचा सत्कार करण्यात आला. उपक्रमात ५ स्टार मानांकन मिळविलेल्या पेडणेकर विद्यालयाने गतवर्षी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत लांजा तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांक, यावर्षी शालेय खो-खो स्पर्धा जिल्हा विजयी, खोखो स्पर्धेत राज्यस्तर स्पर्धेसाठी ९ खेळाडूंची निवड, विज्ञान नाट्य व प्रतिकृती स्पर्धेत यश मिळविले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 23/Dec/2025