Rajapur : तळवडे-आंबेवाडी शाळेमध्ये केंद्रस्तर क्रीडा स्पर्धा उत्साहात

पाचल : पाचल केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा तळवडे आंबेवाडी शाळा क्र. २ येथे उत्साहात पार पडल्या. प्रास्ताविक स्वागत मुख्याध्यापक अनाजी मासये यांनी केले. या स्पर्धेत १६ संघांनी भाग घेतला. यावेळी सरपंच गायत्री साळवी, केंद्रप्रमुख अनाजी मासये, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आरती हातणकर, माजी सरपंच अपेक्षा मासये, शाळा महोत्सव समिती अध्यक्ष सुनील लिंगायत, कार्याध्यक्ष मंगेश रबसे, माजी सरपंच शिवाजी रबसे, वासुदेव गोसावी, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर उपस्थित होते.

शुभारंभाचा कबड्डी सामना तळवडे शाळा क्र. १ व २ विरुद्ध पाचल शाळा क्र. १ यांच्यात खेळवला. या सामन्यात तळवडे आंबेवाडी शाळा क्र. १ व २ चा संघ विजयी ठरला. क्रीडा समिती अध्यक्ष दादासाहेब ठोंबरे व शाळा व्यवस्थापन समितीने या स्पर्धाचे उत्तम नियोजन केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 23/Dec/2025