खेड : पालकमंत्री म्हणून मी पहिल्यांदाच येथे आलो आहे. खेड नगर परिषदेला नियोजन मंडळातून एकही रुपया कमी पडू देणार नाही. विकासकामांसाठी निधीची कोणतीही अडचण येणार नाही, असा शब्द पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला.
खेड नगरपरिषदेवर महायुतीची एकहाती सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्री उदय सामंत सोमवारी (दि.२२) खेड शहरात दाखल झाले. नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवी बुटाला तसेच सर्व विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी ते आले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ना. सामंत म्हणाले की, हा विजय माझा नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. राज्यातील महायुती सरकारवर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतीक आहे.
राज्यमंत्री योगेश कदम, आमदार संजय कदम, सदानंद चव्हाण, राजन साळवी, किरण भैया सामंत आणि संपूर्ण टीमने एकत्रितपणे काम केल्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यात ११ टक्के स्ट्राईक रेट साध्य झाला, असे त्यांनी नमूद केले. शिवसेना-भाजपला खेडवासीयांनी भरभरून दिलेले मत हे जनतेच्या विश्वासाचे द्योतक असल्याचेही त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 23/Dec/2025














