मंडणगड : भररस्त्यात ‘जीतो’ पार्क करणे पडले महागात; वेसवी नाक्यावर बाणकोट पोलिसांची कारवाई

मंडणगड (रत्नागिरी): सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस आणि पादचाऱ्यांना अडथळा होईल अशा धोकादायक रितीने वाहन उभे करणाऱ्या चालकावर बाणकोट सागरी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मंडणगड तालुक्यातील वेसवी नाका येथे ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी वाहन चालकावर भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास मंडणगड तालुक्यातील वेसवी नाका येथे ही घटना घडली. वेसवी ते देव्हारे जाणाऱ्या मुख्य सार्वजनिक रस्त्यावर अहमद अब्बास खोपटकर (वय ३५, रा. शिपोळे बंदर, ता. मंडणगड) याने आपल्या ताब्यातील लाल रंगाची महिंद्रा कंपनीची ‘जीतो’ व्हॅन (क्रमांक MH.08.AN.2391) उभी केली होती. सदर वाहन हे येणाऱ्या-जाणाऱ्या इतर वाहनांना आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होईल, तसेच अपघात घडू शकेल अशा धोकादायक स्थितीत पार्क करण्यात आले होते.

पोलिसांची कारवाई

रस्त्यावरील या बेशिस्त पार्किंगची दखल घेत बाणकोट सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार आजर हमीद शेख यांनी फिर्याद दिली. त्यावरून वाहन चालक अहमद खोपटकर याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ (सार्वजनिक मार्गावर किंवा जलमार्गावर अडथळा किंवा धोका निर्माण करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गुन्हा रजिस्टर नंबर २७/२०२५).

सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतूक कोंडी करणाऱ्या चालकांसाठी ही कारवाई एक इशारा मानली जात आहे. बाणकोट पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 23-12-2025