Ratnagiri : झाडावरून पडून गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : झाडे तोडण्याच्या मजुरीवर काम करणारा तरुण झाडावरून पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अजित संतोष भोवड (३१, रा. डुगवे-कुरतडे, ता. रत्नागिरी) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना १८ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वा. सुमारास चाफे येथे घडली. अजित हा झाडे तोडण्यासाठी तालुक्यातील चाफे येथे गेला होता. दुपारच्या सुमारास झाड तोडत असताना अचानक तोल जाऊन तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने प्रथम मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 23/Dec/2025