पावस : सध्या थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे काजू पिकाला पोषक वातावरण तयार झाले आहे. अनेक काजूच्या झाडाला मोहर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या वर्षीचा हंगाम चांगलाप्रकारे होण्याची चिन्हे दिसू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले आहे.
तालुक्यात हापूस लागवडी बरोबर काजू लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे. त्यामुळे येथील शेतकरी आंबा व काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात करीत असतात यामध्ये काजू पीक लवकर येत असल्याने त्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्याशिवाय त्याला दर चांगला मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे त्याकडे विशेष लक्ष आहे. यावर्षी पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांना काजू पिकाची धास्ती निर्माण झाली होती, परंतु निसर्ग आपले काम माणसापेक्षा चोख बजावत असल्यामुळे यावर्षी उशिरापर्यंत पाऊस पडूनही त्याने विश्रांती घेतल्यानंतर निसर्ग नियमाप्रमाणे थंडीला सुरुवात झाली. सुरुवातीपासून चांगल्या प्रकारे थंडी पडत असल्यामुळे काजू पिकाला पोषक वातावरण तयार झाल्यामुळे यावर्षी काजू पिकाला मोहर येण्यास सुरुवात झाली आहे.
थंडीचे योग्य वातावरण असल्यामुळे या पिकाला चांगली दिशा मिळत आहे. त्यामुळे यावर्षी काजू पिकाचा हंगाम चांगल्या प्रकारे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी ओल्या व सुक्या काजूगराला चांगली मागणी असल्यामुळे चांगला दर मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे झाला होता. यावर्षी थंडीचे प्रमाण चांगल्या त-हेने सुरुवात केल्यामुळे हा हंगाम चांगल्या त-हेने व लवकर सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये ओल्या काजूगराला चांगले उत्पन्न मिळून दरही चांगला मिळण्याची शक्यता सद्यस्थितीमध्ये एकंदरीत वातावरण निर्माण झाल्याच्या स्थितीमध्ये दिसून येत आहे.
यासंदर्भात मावळंगे येथील काजू-व्यवसायिक अनिल बिरजे म्हणाले की. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी काजू पिकाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मोहर येण्यास सुरुवात झाली आहे आणि तो चांगल्या त-हेने आपली प्रगती करत आहे. त्यामुळे पावसाच्या लाभल्यामुळे भीती निर्माण झाली होती. परंतु निसर्गाला शेतकऱ्यांची काळजी असल्यामुळे ताबडतोब मोठ्या प्रमाणात थंडीने सुरुवात झाल्यामुळे काजू पिकाला आवश्यक ते वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येणारा हंगाम चांगल्या त-हेने होऊन दर व उत्पन्न चांगले त्याचे मिळू शकते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 23/Dec/2025














