रत्नागिरी : भाताचे कोठार म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरला असून रब्बी हंगाम ही उशिराने सुरुवात झाली. यंदा ५ हजार ४०५ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य आणि भाजीपाला लागवड करण्यात येणार आहे. आतापर्यंत तीन हजारहून अधिक हेक्टरवर पेरण्यापूर्ण झाल्या आहेत. एकूण ६० ते ६५ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. रब्बी पिकाची लागवड पूर्ण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळी खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बी हंगाम उशिराने सुरुवात झाली. जिल्ह्यात सरासरी ६ हजार हेक्टरवर रब्बी पिकांचे लागवड क्षेत्र आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने वांगी, टोमॅटो, मिरचा, मुळा, पडवळ, वाल, दोडके, कारली, भेंडी, दुधी, घोसाळी, तोंडली, दोडक, काकडी इत्यादी भाज्यांची पेरणी केली. कडधान्य कुळीथ, पावटा, हरभरा, कडवा,पावटासह इतर कडधान्यांची पेरणी करण्यात आली आहे. काही तालुक्यात ऊस ही लावण्यात आले आहे. भात कापणी, मळणी झाल्यानंतर रब्बी हंगामाला सुरूवात होते. यंदा पावसाचा मुक्काम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होता. त्यामुळे रब्बी हंगाम पुढे सरकला आहे. रब्बी हंगामची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. आतापर्यंत ३ हजाराहून अधिक हेक्टवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात रब्बी हंगाम उशिराने सुरू झाल्यामुळे पेरण्याचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण झाले नाही. ५ हजार ४०५ हेक्टरवर रब्बी हंगामचे उद्दिष्ट आहे. तीन हजारहून अधिक हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी
सर्वाधिक पेरण्या राजापूर, रत्नागिरीत
रत्नागिरी जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्यात राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांनी आघाडी घेतलेली असून सर्वाधिक पेरण्या या तीन तालुक्यात झाल्या आहेत. तर सर्वात कमी मंडणगडात झालेली आहे. यंदा पाच हजारहून अधिक रब्बी हंगामचे उद्दिष्ट आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 23/Dec/2025














