रत्नागिरी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवा अंतर्गत गेली 33 वर्षे अविरत चालू असलेल्या शामराव एकांकिका स्पर्धेच्या करंडकावर परित्राण या एकांकिकेने आपली मोहोर उमटवली. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना आणि कल्पकतेला वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी खातू नाट्य मंदिराच्या भव्य रंगमंचावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुधगीकर, शालेय समितीचे अध्यक्ष, श्री. आनंदची देसाई, शामराव करंडक एकांकिका स्पर्धेचे मुख्य प्रायोजक मलुष्ठे कुटुंबीयांचे प्रतिनिधी श्री. कबीर मलूष्टे, आजीव मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा विद्याधर केळकर सहप्रायोजक प्रा. दत्तात्रय वालावलकर, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा शिल्पा तारगावकर प्रा दिलीप शिगाडे, छदोत्सव प्रमुख प्रा. मकरंद दामले उपस्थित होते.
शब्द एक अविष्कार अनेक या स्पर्धेच्या संकल्पनेतर्गत ‘नातीगोती’ हा शब्द देण्यात आला होता. या शब्दाचे अनेककंगोरे उलगडणाऱ्या एकांकिका या स्पर्धे अंतर्गत सादर झाल्या, नेपथ्य, प्रकाश, ध्वनी या सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थी स्वतः पार पाडतात त्यातून रंगभूमीवरील भावी कलाकार घडतात. अशा या प्रतिष्ठित असणाऱ्या एकांकिका स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे..
उत्कृष्ट एकांकिका प्रथम क्रमांक परित्राण, द्वितीय विरक्त तृतीय नात्याचं गणित यांना मिळाला.
उत्कृष्ट तांत्रिक अंग प्रथम परित्राण, उत्कृष्ट प्रकाशयोजना प्रथम. संस्कार दत्ताराम पांचाळ, ( परित्राण) द्वितीय शौर्य पंकज सिवंदे (विरक्त) तृतीय प्रणय शैलेंद्र भाटकर (नात्याचं गणित) उत्कृष्ट पार्श्व संगीत – प्रथम- विनीत विवेक पवार (विरक्त) द्वितीय गंधार सुनील दामले, गिरीराज दिगंबर लिंगायत, वृंदा संतोष दळवी (परित्राण) तृतीय आबा मृणाल म्हैसकर, (नात्याचं गणित) उत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा – कु. अथर्व रुपेश सुपल (राजे) उत्कृष्ट नैपथ्य- प्रथम- ऋषिकेश शशिकांत कोळवडेकर, (परित्राण) दुतीय स्वरदा सत्यजित गुरव (विरक्त) तृतीय अथर्व योगेंद्र चव्हाण ( नात्याचं गणित) सर्वोत्कृष्ट लेखन प्रथम यश प्रभाकर पावस्कर (परित्राण) द्वितीय मयुरेश प्रवीण सावंत (नात्याचं गणित), तृतीया यामिनी किशोरकुमार पोयरेकर, (विरक्त) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन* प्रथम – विघ्नेश सुजित जोशी (परित्राण) द्वितीय आबा मंगेश साखळकर (विरक्त) तृतीय -सूर्याक्ष सचिन रेबने (नात्याचं गणित) सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय प्रथम वेदांत उदय कोकजे (विरक्त) द्वितीय- यश प्रभाकर पावस्कर (परित्राण) तृतीया सूर्याक्ष सचिन रेमणे (नात्याचं गणित) सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनय प्रथम- हर्षाली दिगंबर सावंत. (परित्राण) द्वितीय आयुषी संदीप नाईक, (विरक्त) तृतीया ऊर्जा हर्षद आपटे (बुरगुंडा) सर्वोत्कृष्ट खलनायक रोहन महेश भोपड, (विरक्त) या स्पर्धेचे परीक्षण रत्नागिरीतील श्रीरंग नाट्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री भाग्येश खरे आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक लेखक व अभिनेते श्री प्रदीप तेंडुलकर यांनी केले. या एकांकिका स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी राजनजी मलूष्टे महाविद्यालयाचे आजी-माजी शिक्षक, रत्नागिरी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि माजी विद्यार्थी यांनी विविध व्यक्तींच्या स्मरणार्थ बक्षिसे प्रायोजित केलेली असतात. विजेत्या संघाला फिरता चषक दिला जातो. प्राचार्य मकरंद साकळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रभात कोकजे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 23/Dec/2025













