Ratnagiri : भरधाव टाटा टिपर काजू बागेत उलटला; चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : बेदरकारपणे टाटा टिपर गाडी चालवून अपघात करत गाडीतील माल आणि गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शनिवार 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास जयगड ते निवळी जाणाऱ्या रस्त्यावरील चाफे धनगरवाडा येथे घडली.

दिनेशकुमार खेद यादव (45, रा. उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात क्लिनर आशुतोष संतोषकुमार यादव (22, रा. पनवेल, रायगड) याने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवार 20 डिसेंबर रोजी चालक दिनेशकुमार यादव हा आपल्या ताब्यातील टाटा गाडी (एमएच-46-डीसी-8010) ही घेउन भरधाव वेगाने जयगड ते निवळी जाणाऱ्या रस्त्याने जात होता. तो चाफे धनगरवाडा येथील पुष्प काजू बागेच्या समोर आला असता त्याचा गाडीवरील ताबा सूटला त्यामुळे गाडी रस्त्याच्या डाव्या बाजुच्या साईड पट्टीवरुन घसरुन पटल्यामुळे हा अपघात झाला. यात गाडीतील मालाचे नुकसान झाले असून गाडीचेही नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 23/Dec/2025