ST BUS : एसटीच्या हेल्पलाईनवर होणार विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण; महाव्यस्थापकांचे विभाग नियंत्रकांना परिपत्रकाद्वारे आदेश

रत्नागिरी : शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विद्यार्थी सुखरूप घरी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला. अवघ्या काही दिवसानंतर ४०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बस वेळेवर न येणे, थांब्यावर न थांबणे यासह विविध तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्या तक्रारीचे निरसन करा व तक्रारदारांना कळवा असे आदेश एसटी विभागाच्या महाव्यवस्थापकांनी रत्नागिरीसह राज्यातील एसटीच्या विभाग नियंत्रकांना परिपत्रकाद्वारे शुक्रवारी दिले आहेत.

दरम्यान, रत्नागिरीतून ६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या व त्यांचे निरसन केले असल्याचे सांगण्यात आले आहे. परिवहन मंत्र्यांनी शालेय विद्यार्थिनीसाठी शाळेत वेळेत जावे, घरी लवकर जावे यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला. तक्रार करण्यास आवाहन केले होते. यामुळे रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यातून तक्रारींचा पाऊस पडला आहे.

शालेय बस वेळेवर येत नाही, बस फेरी बऱ्याच वेळेस रद्द होते, उशिरा लावली जाते, पास खिडकी बंद, विद्यार्थ्यांकरिता बस थांब्यावर थांबली नाही अशा तक्रारी हेल्पलाईनवर विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे शालेय तक्रारीचे निवारण करावे तसेच तक्रारदारांना तक्रार निरंसन केल्याचे सांगावे व सातत्याने एकाच प्रकारची तक्रार किंवा ठराविक फेरीवर तक्रार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आदेश महाव्यवस्थापकांनी दिले आहे.

रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांछे, उस्मानाबाद, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अकोला यासह विविध जिल्ह्यातील विभाग नियंत्रकांना परिपत्रकाद्वारे आदेश दिले आहेत.

रत्नागिरी शहरातील शालेय फेरीसाठी वाट पाहावी लागते. बसेस वेळेवर येत नाही. त्यामुळे घरी जाण्यास उशिर होतो. पालक ही चिंतेत असतात. हेल्पलाईन सुरू केली चांगलीवाव आहे. मात्र, त्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. –आदिल शेख, विद्यार्थी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 23/Dec/2025