लांजा येथे उद्या ‘दी फोक आख्यान’

लांजा ः मराठी संस्कार, संस्कृती आणि लोककलेचा वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचवणारा आणि भारतातच नव्हे तर जगभरात हाऊसफुल होणारा मराठी कार्यक्रम ‘दी फोक आख्यान’ हा बुधवारी (ता. २४) सायंकाळी ५.३० वाजल्यापासून लांजा येथील नारकर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. पा

लकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला जसे भारूड, लावणी, गवळण, ओवी आणि लोकसंगीताला आधुनिक पद्धतीने सादर करणारा एकमेव लोकप्रिय संगीतमय कार्यक्रम म्हणजे दी फोक आख्यान होय. दी फोक आख्यान म्हणजे मराठी लोकसंगीताचा व रोमांचकारी अनुभव देणारा जुन्या आणि नव्याचा संगम साधणारा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करणारा कार्यक्रम आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडतील अशी गाणी सादरीकरण असल्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण याचा आनंद घेऊ शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:27 23-12-2025