बेळगाव : सातारा येथे एक ते चार जानेवारीपर्यंत पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सीमाप्रश्नी ठराव करण्यात येईल, असे आश्वासन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला दिले.
मध्यवर्ती समितीतर्फे जोशी यांना संमेलनामध्ये सीमाप्रश्नाचा ठराव मांडावा, अशा मागणीचे पत्र पाठविले होते. त्याची दखल घेत सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संदर्भातील ठराव निश्चितपणे मांडला जाईल, अशी माहिती देणारे पत्र मध्यवर्ती समितीला पाठविण्यात आले आहे. गेल्या ६९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाची लवकर सोडून व्हावी, यासाठी महाराष्ट्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. तसेच न्यायालयीन प्रक्रिया लवकर सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मराठी भाषकांची हक्कांची व मातृभाषेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि मराठी भाषकांची मोठी लोकसंख्या लक्षात घेऊन हा ठराव ठोसपणे घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. साहित्य संमेलन महामंडळाने मराठी भाषकांची हक्कांची व मातृभाषेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, तसेच मराठी भाषकांची मोठी लोकसंख्या लक्षात घेऊन, हा ठराव ठोसपणे घेण्यात येईल, असे आश्वासन समितीला देण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातमध्येही सीमाप्रश्नाचा ठराव मांडण्याची मागणी करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीबाबत ठराव मांडण्यात आला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:01 23-12-2025














