देवरूख : संगमेश्वर तालुक्यामधील राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री देव मार्लेश्वराचा यात्रोत्सवजवळ आला असून, आतापासूनच सह्याद्रीला यात्रेचे आणि मार्लेश्वराला विवाहाचे वेध लागले आहेत.
श्रीदेव मार्लेश्वराचा यात्रोत्सव १३ व १४ जानेवारीला साजरा होणार आहे. या यात्रोत्सवात कोंडगावची गिरिजादेवी व श्री देव मार्लेश्वर यांचा विवाह मकर संक्रांतीला पारंपरिक पद्धतीने होणार आहे.
या सोहळ्यासाठी कोंडगावची गिरिजादेवीला सजवलेल्या पालखीतून भोगीच्या दिवशी पायी चालत मार्लेश्वर नगरीत आणण्यात येईल. सध्या मार्लेश्वर नगरीत यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू अाहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:12 23-12-2025














