गणपतीपुळेत आजपासून जिल्हास्तरीय सरस उत्पादन प्रदर्शन

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे बुधवार, दि. २४ ते २८ डिसेंबर या पाच दिवसीय कालावधीत जिल्हास्तरीय रत्नागिरी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गणपतीपुळे देवस्थानच्या देव बागेत या प्रदर्शनाचे उद्घाटन २४ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण स्वयंसहायता समूहनिर्मित उत्पादनाचे प्रदर्शन व विक्री अंतर्गत या प्रदर्शनात रत्नागिरी जिल्ह्यातील बचत गटांचे स्टॉल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या प्रदर्शनात हस्तकला वस्तू, कोकणी मेवा, सांस्कृतिक संध्या, खाद्य दालन अशा स्वरूपात हे प्रदर्शन खास आकर्षण ठरणार आहे. या प्रदर्शनात खास कोकणी उत्पादने व खाद्यपदार्थ असणार

गणपतीपुळे जागतिक दर्जाचे पर्यटन असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. तसेच नाताळ हंगाम व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो पर्यटक दाखल होत असतात. या उद्देशाने बचत गटांना एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊन मोठी आर्थिक उलाढाल करता यावी यासाठी दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन गणपतीपुळे येथे केले जाते.

उद्घाटनाला खासदार सुनील तटकरे, नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, शेखर निकम, भास्कर जाधव, किरण सामंत, गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच नीलेश कोल्हटकर, सरपंच कल्पना पक्यये, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यादव, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे उपस्थित राहणार असल्याचे, जिल्हा अभियान व्यवस्थापक अजाज पीरजादे, गटविकास अधिकारी चेतन शेळके व जिल्हा अभियान सहसंचालक विजयसिंह जाधव यांनी केले आहे.

७५ बचतगट होणार सहभागी : सीईओ
या प्रदर्शनामाध्ये जिल्ह्यातील एकूण ७५ बचत गट सहभागी होणार आहेत. यामध्ये ६० उत्पादनाचे स्टॉल व १५ फूड स्टॉल आहेत. १०७स्वयंसहायता समूह, ४ महिला शेतकरी व उत्पादक कंपन्या व १ उद्योग विकास केंद्र यातील महिला सहभागी होणार आहेत, अशी माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 24/Dec/2025