राजापूर : शासनाचा १५ मार्च २०२४ चा संचमान्यता शासन निर्णय रद्द करावा, अशी एकमुखी मागणी रायपाटण ग्रामपंचायतच्या विशेष ग्रामसभेमध्ये करण्यात आली. सोमवारी (२२) डिसेंबर) रोजी ग्रामपंचायत रायपाटण ची विशेष ग्रामसभा जिजामाता विद्यामंदिर रायपाटणच्या स्व. सौ. अरुणा अनंतशेठ गांगण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती.
या ग्रामसभेला सरपंच नीलेश चांदे, उपसरपंच विजय जडयार, ग्रामपंचायत सदस्या संजीवनी कारेकर, प्रीती नमसे, दीपा महेश गांगण, समीक्षा चव्हाण, ग्रामसेवक आकाश चव्हाण, भास्कर गांगण, रायपाटण गावकरी संघाचे सरचिटणीस विलास गांगण, संचालक शैलेश शेटे तसेच भास्कर गांगण गावचे पोलिस पाटील महादेव नेवरेकर, स्वप्निल गांगण, अमृता पांचाळ तसेच ग्रामस्थ मंगेश पराडकर, संदीप कोलते, प्रकाश पाताडे, प्रसाद पळसुळेदेसाई, राजेश नलावडे, संदीप नेवरेकर, प्रदीप नेवरेकर, प्राथमिक शिक्षक अंगणवाडी शिक्षिका या सभेला उपस्थित होते. यावेळी शासनाच्या जीआर वरती चर्चा करण्यात आली. शासनाच्या या जीआरमुळे अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अशा प्रकारची भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली आहे.
त्यामुळे खेडेगावातील मुले पुढील शिक्षणासाठी कुठे जाणार असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झालेला आहे तरी हा शासन निर्णय लवकरात लवकर बदलून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण त्याच्या गावातच मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार सर्वांनी मांडला. शेवटी हा शासन निर्णय रद्द करावा, असा एकमुखी ठराव या ग्रामसभेत करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 24/Dec/2025














