चिपळूण : शहरातील नागरिकांनी दिलेला कौल आम्हाला मान्य असून आम्ही जनतेच्या मताचा आदर करतो. विजयी नगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवकांना आपले पूर्ण सहकार्य राहील, असे मत माजी आमदार आणि नगराध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार रमेश कदम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत यश, अपयश येत-जात असते. त्यामुळे आता ज्या नगरसेवकांना चिपळूणच्या नागरिकांनी संधी दिली आहे त्यांनी या शहराची गेली काही वर्षे नगर परिषदेची विस्कटलेली घडी नीट बसावावी. न. प. इमारत, ग्रॅव्हिटी पाणी योजनेसारखे प्रकल्प मार्गी लावावेत.
दर्जा विकासकामांचा राखण्यासाठी योग्य नियोजन करावे. विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना माझे माजी आमदार म्हणून पूर्ण सहकार्य राहील. शहराच्या विकासासाठी आणि न.प.च्या चांगल्या कामांसाठी मी सदैव पाठीशी उभा राहीन, असेही रमेश कदम यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 24/Dec/2025














